देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात फणसगाव विभागात भाजपने मुसंडी मारली असून चार ग्रामपंचायतीवर सरपंचांची निवड बिनविरोध झाली आहे. हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
भाजपचे बिनविरोध आलेले सरपंच म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या कामाची पोचपावती आहे आमदार नितेश राणे हे करत असलेला विकास पाहता गावाने आमदार नितेश राणे यांच्या विकासावर विश्वास दाखवला व भाजपचे कार्यकर्ते बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले.
पाटगावचे सरपंच नितेश गुरव, गोवळच्या सरपंच दीपाली दिनेश मेस्त्री, गवाणेच्या सरपंच नैना आयरे, कुणकवणच्या सरपंच वैशाली पांचाळ. हे भाजपचे सरपंच असून बिनविरोध झालेल्या सरपंचांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.
हे सरपंच बिनविरोध व्हावे यासाठी भाजपचे पडेल मंडल अध्यक्ष डॉक्टर अमोल तेली तालुका जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तेथील कार्यकर्ते बंड्या नारकर, राजू जठार, कृष्णा नर, मिलिंद सोमले, उदय पाटील, डॉ. सर्वेश नारकर यांनी मोलाचे प्रयत्न केले आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…