Tuesday, April 22, 2025
Homeअध्यात्मनिसर्ग नियमांचा राजा

निसर्ग नियमांचा राजा

सद्गुरू वामनराव पै

आपल्या समाजात तीन प्रकारचे लोक आहेत. पहिला कष्टकरी वर्ग, दुसरा मध्यम वर्ग आणि तिसरा उच्च वर्ग. उच्च वर्गातल्यांना कधीच पर्वा नसते. पैशाच्या जीवावर ते लोक वाट्टेल ते कर्म करतात. सगळेच श्रीमंत असे नसतात पण त्यातील काहींना असे वाटते की पैशांमुळे आपण वाट्टेल ते निभावून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आपण कसे कर्म करतो याची कसलीच चिंता नसते. दुसरे म्हणजे मध्यम वर्ग. त्यांना जर सांगितले की, तुम्ही जरा या जीवनविद्येचा अभ्यास करा. प्रबोधने ऐका तर ते तयारच नसतात. सगळेच मध्यमवर्गीय तसे असतात असे मी म्हणत नाही. पण आमचा असा अनुभव आहे की, मध्यमवर्गीय लोक फार चिकित्सक असतात व ते काही ऐकायलाच तयार नसतात. ऐकले तर या कानाने ऐकतात व या कानाने सोडून देतात. काही लोक तर असे विचारतात की, तुम्ही सांगता हे खरे कशावरून. मला एका अमेरिकन बाईने विचारले, तुम्ही प्रार्थनेचे एवढे महत्त्व सांगता ते खरे कशावरून. मी तिला म्हटले, तुम्ही अनुभव घ्यायचा मग तुम्हाला कळेल. साखर गोड आहे कशावरून, चिंच आंबट आहे कशावरून, मीठ खारट आहे. कशावरून तोंडात टाक मग तुला कळेल. अनुभव न घेता नुसतेच “कशावरून” विचारलेत तर मी काय उत्तर देणार.

सांगायचा मुद्दा असा, आपण जे कर्म करतो म्हणजेच Action करतो. त्याचा संबंध निसर्गनियमांशी येतो. कर्म केले की Reaction होतेच. Action त Reaction हा निसर्गनियमांचा राजा आहे. प्राण्यांचा राजा सिंह, मांशाचा राजा देवमासा, पक्ष्यांचा राजा गरूड, फळांचा राजा आंबा तसे Action त Reaction हा नियम म्हणजे सर्व निसर्गनियमांचा राजा आहे. बाकीचे निसर्ग नियम हे या नियमासंबंधित आहेत. As you think, So you become यांत As you think ही Action व So you become ही Reaction। Law of Cause and Effect हयांत Cause ही Action तर Effect ही Reaction. याचा अर्थ असा जिथे Action आहे तिथे Reaction ही असतेच. हे असे निसर्गाचे नियम अनेक आहेत त्यापैकी मी पुष्कळसे सांगितलेले पण आहेत.

सांगायचा मुद्दा हे सर्वच निसर्गाचे नियम मानवी जीवनात निर्णायक आहेत. ते कुणाच्याही बाबतीत अपवाद करत नाहीत. आपणच नियम करायचे व त्या नियमांत आपणच एखादी स्पेशल केस करायची असे माणूस करतो पण निसर्गाचे नियम अशा स्पेशल केस करत नाही. निसर्गाच्या दरबारात राजा व प्रजा अथवा श्रीमंत व गरीब सर्वांना निसर्गाचे नियम सारखेच. मी हे सांगत होतो की, हे मध्यमवर्गीय फार चिकित्सक¸ पण तिसरा कष्टकरी वर्ग जो असतो ते सद्गुरू सांगतात ना मग ते खरे असले पाहिजे, असे म्हणतात. ते फार विचारही करत नाहीत. सद्गुरू सांगतात म्हणजे ते बरोबर असलेच पाहिजे असे म्हणून ते सद्गुरू सांगतात तसे जिद्दीने करतात व त्यांना त्याचे चांगले अनुभव लवकर येतात. कारण त्यांची सद्गुंठायी व सद्गुरू जे सांगतात त्यावरही श्रद्धा असते. आमच्या मंडळात ९५ टक्के गरीब लोक आहेत ते सगळे सुखी झाले. किंबहुना ज्यांनी ज्यांनी जीवनविद्येचे तत्त्वज्ञान आचरणांत आणले ते तर सर्वच सुखी झाले. आम्ही तर असे सांगतो की जीवनविद्येचे तत्त्वज्ञान १०० टक्के आचरणात आणणे तुम्हाला शक्य नाही पण १० टक्के तरी आचरणांत आणा. आम्ही ही जी प्रार्थना सांगतो तेवढी केली तरी पुरे. या प्रार्थनेचा कष्टकरी वर्गाला, कामगार वर्गाला अनुभव येतो कारण त्यांची श्रद्धा त्यांचा विश्वास सद्गुंरूवर असतो व सद्गुरू काय सांगतात ह्यावर असतो. आता आपल्याला जर असे य¸ समृद्धी व सुखी जीवन पाहिजे असेल तर सद्गुरू पाहिजे व त्यांचे मार्गदर्शन पाहिजे. आता असे सद्गुरू करायचे की न करायचे हे तू ठरवू कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -