Tuesday, February 11, 2025
Homeअध्यात्मसोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवार २७ जानेवारी २०२५ रोजी पौषातील सोमप्रदोष शिवरात्री आहे. या दिवशी मनापासून निवडक उपाय केल्यास पितृदोषातून मुक्त होण्यास मदत होईल. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा शुभ योग जुळून आला आहे. सोमवारी प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही भगवान शंकराला समर्पित असलेली व्रते एकाच वेळी येत आहेत. या दिवशी निवडक उपाय केल्यास वास्तूदोष, पितृदोष दूर होण्यास मदत होईल. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शंकराला अर्थात भगवान महादेव यांना समर्पित आहे. सोमप्रदोषाच्या दिवशी पांढरे पदार्थ (उदा : पांढरा भात, पांढऱ्या लाह्या, तांदुळ पीठ वापरुन तयार केलेली भाकरी, मुळ्याची भाजी किंवा कच्चा मुळा, काकडीची कोशिंबीर किंवा कच्ची काकडी, पांढरी बटाट्याची भाजी, पनीरपासून तयार केलेले पदार्थ, इडली, डोसा, खोबऱ्याची चटणी, कढी, दही, ताक, रव्याची खीर, शेवयांची खीर) खावे. शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. गरजूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. चंद्र देवाचे नामस्मरण करावे. यामुळे कुंडलीतील चंद्र मजबूत होण्यास मदत होते. प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही एकाच दिवशी असल्यामुळे भगवान शिव अर्थात भगवान शंकर यांची मनापासून पूजा करावी. शिवपूजनाने कामातील अडथळे दूर होण्यास तसेच प्रगती होण्यास मदत होते.

घराच्या या दिशेला अ‍ॅक्वेरियम ठेवणे मानले जाते शुभ

भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले, बेलाची पाने (बिल्व पत्र किंवा बिल्व दल) अर्पण करावी. रुद्राभिषेक करावा. ॐ नमः शिवाय हा जप करावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शिव परिवाराचे चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करावी. घराच्या पूर्वेकडील अथवा वायव्येकडील भागात बेलाचे रोप लावावे. दररोज सकाळ – संध्याकाळ या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होईल.

जाणिवेचा आरसा

घरात कलह किंवा इतर गंभीर समस्या असल्यास त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करावा. लघुरुद्र किंवा महारुद्र करावे. हे उपाय मनापासून करण्याने लाभ होतो.

उपासना, आराधना आणि भक्ती

ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते. यामुळे रुद्राभिषेक याच दिशेला करावा. घराच्या ईशान्येस चंदनाचे खोड ठेवावे.

नामस्मरणरूपी शेताची मशागत

घरात शुद्ध पाऱ्यापासून तयार केलेले पारद शिवलिंग ठेवावे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने नियमित पूजा करावी. मनापासून हे कृत्य करण्याने घराचे रक्षण होते. घरावरील संकटे टळतात. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. पण पारद शिवलिंग घरात ठेवताना शिवपुराणात नमूद असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

श्री स्वामी समर्थ दिव्य नाम महिमा

‘दत्त तोची स्मतृगामी’

पारद शिवलिंगाची दररोज मनापासून पूजा केल्या पितृदोष दूर होण्यास मदत होते.

अस्वीकरण : नमूद माहिती गृहितके, चालीरीती, रुढी, परंपरा यांच्यावर आधारित आहे. या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -