कॉमनवेल्थ तायक्वांदोच्या व्यवस्थापन मंडळावर नामदेव शिरगावकर

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांची जागतिक कॉमनवेल्थ तायक्वांदोच्या व्यवस्थापन मंडळ सदस्यपदी निवड झाली आहे. या मंडळावर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत.


ऑस्ट्रेलिया येथे २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळामध्ये तायक्वांदो या खेळाचा सहभाग व्हावा यासाठी जागतिक तायक्वांदो संघटनेच्या वतीने प्रत्येक खंडातून एका सदस्याची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आशिया खंडातून नामदेव शिरगावकर यांची निवड करण्यात आली. जागतिक तायक्वांदोचे अध्यक्ष डॉ. चुंगवॉन चौ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.


जागतिक कॉमनवेल्थ तायक्वांदोच्या व्यवस्थापकीय मंडळात नियुक्ती होणे आणि काम करायला मिळणे हा माझा सन्मान समजतो. भारत देश आशियातील प्रमुख तायक्वांदो हब बनण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे या संधीच्या माध्यमातून त्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. तायक्वांदो खेळाडूंसाठी चांगले काम भविष्यात करणार असल्याची ग्वाही देखील शिरगावकर यांनी दिली. जागतिक तायक्वांदोसह प्रत्येक देशाच्या संबंधित फेडरेशन तायक्वांदोचा कॉमनवेल्थ खेळ म्हणून समावेश करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष या नात्याने खेळाडूंना अधिकाधिक सुविधा आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

Comments
Add Comment

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार

मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई

BMC Election 2026 : शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 'या' विश्वासू नगरसेवकाची गटनेते पदी निवड

मुंबई: शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी

Mumbai metro 4: मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई: मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार

Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखेत बदल; आता 'या' तारखांना होणार परीक्षा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे