Mumbai metro 4: मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई: मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले.


एमएमआरडीएचा उत्कृष्ट समन्वय


तब्बल ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत एमएमआरडीएने उत्कृष्ट समन्वय साधला.





केवळ दोन रात्रींमध्ये काम पूर्ण


उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले. या मोहिमेसाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. नागरिकांना अत्यल्प त्रास होईल, याची विशेष काळजी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले.


या स्टील स्पॅन्सच्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे.

Comments
Add Comment

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची