कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे रुंदीकरण तसेच सुधारणा करण्यात येणार आहे. येथील विनोबा भावे नगर नाल्यावर मोठ्याप्रमाणात झोपड्यांचे अतिक्रमण असून हे अतिक्रमण आता नाला रुंदीकरणामध्ये हटवले जाणार आहे. त्यामुळे येथील भारतीय नगरसह आसपासच्या विभागात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे होणारी समस्या आता कायमचीच दूर होणार आहे.


कुर्ला परिसरातील काही भागांमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची मोठी समस्या लक्षात घेता महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने प्रिमियर नाल्याला जोडणारे सर्व उपनाले आणि रस्त्या लगतच्या पेटीका नाल्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिम येथील मोठया नाल्यांसह छोटे नाले आणि पेटीका नाल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या कामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी इकॉन इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीची निवड करण्यात आली आहे.


पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,प्रिमीयर नाला प्रणाली मधील भारतीय नगर नाल्यालगतच्या भारतीय नगर उपनाला-२ चे व त्याला जोडून असलेल्या पजवा पेटीकेचे आणि मोरेश्वर पाटणकर रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सुधारणा, पुनर्बाधणी व बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. बहुतांश भागातील पावसाचे पाणी वरील बाजुने उप नाला प्रणालीमधून म्हणजेच लालमाटी नाला आणि रामदेव पीर रस्त्यावरील पजवा पेटीका मधून वाहत येऊन मोठ्या नाल्यांना म्हणजेच भारतीय नगर नाल्याला मिळते.


प्रिमीयर नाला प्रणाली मधील भारतीय नगर नाला हा मोठा नाला आहे आणि भारतीय नगर उप नाला-२ हा रामदेव पीर रस्त्याच्या बाजूने सुरु होतो व पुढे विनोबा भावे नगर नाला येथे जावून मिळतो. या नाल्याचा बहुतांश भाग हा स्थानिकांनी नाल्यावर लादी बांधून अनधिकृत झोपडयांची बांधकामे करुन झाकलेला आहे. या नाल्यावरील या अनधिकृत बांधकामामुळे हा नाला मोडकळीस आलेला आहे व या नाल्यामधून पावसाळी पाण्याचा निचरा पूर्णपणे तथा व्यवस्थित होण्यास खुप अडथळा निर्माण होतो. परिणामी भारतीय नगर परिसराजवळील वस्त्यांमध्ये पावसाळी पाणी साचून दरवर्षी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे,या नाल्याची सुधारणा, तसेच पुनर्बाधणी व बांधकाम करण्यात येत आहे. ज्यामुळे पावसाळी पाण्याचा सहज व व्यवस्थित निचरा होऊ शकेल व भविष्यात कोणतीही जिवितहानी वा मालमत्तेचे नुकसान होणे टाळता येणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी