थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपत आहे, अशा शब्दांत शहा यांनी म्हटले आहे.
केरळमधील थिरुवअनंतपुरम इथे भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने एससी-एसटी समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.
शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे, तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल, तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने कधीही अनुसूचित जमाती आणि गरिबांसाठी काम केले नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असेच समजले. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक भागांमध्ये अमित शहा यांचे दौरे वाढीस लागले आहे. गृहमंत्री म्हणून सुव्यवस्थेचा आढावा घेताना राज्याराज्यांतील अभ्यास अमित शहा करत आहेत.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…