राज्यात पाच कोटी १४ लाख नागरिक संरक्षक डोस घेण्यापासून दूर

पुणे (हिं.स.) : केंद्र सरकारने संरक्षक डोस (बूस्टर डोस) मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी आजमितीला राज्यात पाच कोटी १४ लाख नागरिक संरक्षक डोस घेण्यापासून दूर राहिल्याची माहिती समोर आली आहे. आता डोस मोफत असल्याने किमान नागरिकांनी संरक्षक डोस घेऊन स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, अशी अपेक्षा आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे.


राज्यासह देशात करोनाच्या संसर्गाची साथ मार्च महिन्यानंतर ओसरली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या बीए ४ आणि बीए ५ या उपप्रकाराने डोके वर काढले. त्यापाठोपाठ आता बीए २.७५ या उपप्रकाराचे रुग्ण वाढले आहेत. आजमितीला राज्यात पुण्यासह मुंबई, नागपूर, ठाणे, पालघर; तसेच रायगड, अकोला, यवतमाळ या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सर्वाधिक ६५, मुंबईत ३३ रुग्ण आढळले आहेत.


आजमितीला राज्यात बीए ४ आणि बीए ५ या रुग्णांची एकूण ११३; तसेच बीए २.७५ प्रकाराचे ४० असे रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संरक्षक डोस घेण्याचे आवाहन केले होते. केंद्राने यापूर्वी संरक्षक डोस केवळ खासगी रुग्णालयात सशुल्क उपलब्ध केले होते. त्यामुळे नागरिकांनी या डोसकडे पाठ फिरविली होती. परदेशात प्रवास करण्यासाठी काहींनी खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक डोस घेतला. मात्र, पुण्यासह राज्यात त्याचे प्रमाण कमी आहे. आता संरक्षक डोस सरकारी रुग्णालयात मोफत देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. त्यामुळे संरक्षक डोस आता सर्वांना मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक