मनसेचे आता महिला'राज'!

  80

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता चांगलीच कामाला लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या बांधणीसाठी सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकतीच मनसेने कामगार सेना, नाविक सेना आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या होत्या. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सुद्धा आता रिंगणात उतरली असून आज महिला सेनेची “राज्यस्तरीय कार्यकारणी” मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे व रिटा गुप्ता यांनी जाहीर केली आहे.


पहिली यादी आज जाहीर करण्यात आली असून लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मध्यवर्ती कार्यकरणी जाहीर करण्यात येणार आहे.



या कार्यकारणीत महिला सेना सरचिटणीस व उपाध्यक्षा जाहीर केल्या आहेत. यात सुप्रिया दळवी, स्नेहल जाधव, सुचीता माने व दीपिका पवार यांची महिला सेना महिला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


त्याचबरोबर मुंबई क्षेत्रातील विविध लोकसभा क्षेत्रात महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून ग्रेसी सिंग - दक्षिण मुंबई, ऋजुता परब – दक्षिण मध्य मुंबई, सुप्रिया पवार – उत्तर मुंबई, मीनल तुरडे – उत्तर मध्य मुंबई, सुनीता चुरी – उत्तर पश्चिम, अनिषा माजगावकर - ईशान्य मुंबई यांची तर सुजाता शेट्टी यांची महिला योजना व धोरण पदी वर्णी लागली आहे.


महिला सेना मुंबई पुरती मर्यादित न राहता इतर जिल्ह्यातही फोफावली असून याच पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातही नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये अलका टेकम - यवतमाळ, रेखा नगराळे – लातूर, सोनाली शिंदे- सातारा, वर्षा जगदाळे – बीड, सुजाता ढेरे – नाशिक, दीपिका पेडणेकर – डोंबिवली, चेतना रामचंद्रन - कल्याण पूर्व व उर्मिला तांबे – कल्याण पश्चिम यांना महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.



दरम्यान, आगामी पालिका निवडणुक तोंडावर आली असताना महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चांगलीच तयारीला लागली असून महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या पालिका निवडणुकीत मनसेच्या विजयात महिला सेना सिंहाचा वाटा उचलेल अशी आशा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रिटा गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित