प्रेम प्रकरणातून वाद, माय-लेकींची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

मुंबई (हिं.स.) : पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात एका चालकाने आपली मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. चालक शिवदयाल सेन याने तिघींचा गळा दाबून खून केला.


अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील आई आणि दोन मुलींची त्यांच्याच चालकाने हत्या केली. खून करण्यासाठी चालकाने धारदार शस्त्राचा वापर केला. यानंतर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चालक आणि मृतांमधील धाकटी मुलगी यांच्यात प्रेमाचे संबंध होते. यावरून आई, मुलगी आणि चालकामध्ये वाद झाला. यानंतर चालकाने पहिल्यांदा आईची हत्या केली, मग दोन्ही बहिणींचा खून करून स्वत:चे देखील आयुष्य संपवले.


कांदिवली परिसरातील देना बँक जंक्शन येथे ही घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला. तेव्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसराची झडती घेण्यात आली. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.


अधिक तपासात पोलिसांना चालक शिवदयाल सेन याच्या कपड्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. ज्यात त्याने लिहिले आहे की, माझे भूमीवर प्रेम आहे. परंतु आमचे संबंध मान्य नसल्यामुळे मी तिघींचा खून करून स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे. कांदिवली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य

‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’

पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार प्रस्तावित

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास होणार सुसाट मुंबई : पूर्व मुक्तमार्ग म्हणजेच इस्टर्न फ्रीवेच्या विस्तार करण्याचा

महाराष्ट्र हेच भारताचे ‘स्टार्टअप कॅपिटल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नावीन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची