रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला बंदी

सोलापूर (हिं.स.) : शहरात पाचशेहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. स्कूल बस परवडत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना रिक्षातून शाळेत पाठवतात. रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई किंवा रिक्षा जप्त होईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिला आहे.


शहरातील नामांकित शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाहीत, तसेच स्कूल बसचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची मुले दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. परवडेल अशा दरात त्यांच्या परिसरातील रिक्षांतून आपल्या मुलांना शाळेत पाठवितात.


पण, रिक्षांमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. तर दुसरीकडे, एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुलांची वाहतूक केली जाते. त्यामुळे आता रिक्षांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये याकडे आरटीओचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शाळांनाही त्याबाबत आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील

Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा

Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४