Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील (राज्य महामार्ग क्र.५४) वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.


या आदेशानुसार हा कार्यक्रम मौजे रामलिंग, ता. शिरुर येथे होत असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात येणार आहे. भक्तगणांना आपली वाहनं वाहनतळ ठिकाणी पार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी जाता येणार आहे.



वाहतूक मार्गात बदल...


पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जातील.


मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे अहिल्यानगर हायवे रोडला मिळून शिरुरमध्ये जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली