मध्य रेल्वेवर आज-उद्या मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत ४ आणि ५ जून रोजी मध्य रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने ही महत्त्वाची माहिती दिली आहे.


मध्य रेल्वे दादर स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज गर्डर काढण्यासाठी मेगाब्लॉक आहे. ठाकुर्ली स्थानकावरील एन-टाइप जुना फूट ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी रात्रीची ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. त्यामुळे ३ जून ते ४ जून २०२२ रोजी शुक्रवार आणि शनिवारी भायखळा - माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर ००.४० ते ०६.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.


एक्सप्रेस गाड्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. या गाड्या दादर येथे दोनवेळा थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन मेल/एक्स्प्रेस (२२१०५ इंद्रायणी एक्स्प्रेस) भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर येथे दोन वेळा थांबणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या/सुटणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या नियोजित थांब्यानुसार थांबणार आहेत. माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप/डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. शनिवार ४ ते ५ जून रोजीही मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री ००.४० ते ०५.४० पर्यंत भायखळा - माटुंगा डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.


१२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन जलद मार्गावरील उपनगरीय सेवा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या गाड्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबणार आहेत.


शनिवारी ४ जून आणि रविवारी ५ जूनला ०१.१५ ते ०३.३५ पर्यंत कल्याण - दिवा अप आणि डाऊन जलद/धिम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजल्यापासून ००.२४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

Comments
Add Comment

महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात

कचऱ्याच्या जुन्या आणि खराब वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील