अकोला : अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहेत. ७४ जागा खुल्या प्रवर्गासाठी राहतील.
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवारांसाठी आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये आठ जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्या. त्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ आणि २३-अ या जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी २४-अ जागा महिला राखीव करण्यात आली.
सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या आहेत. त्यामध्ये ‘अ’ मध्ये १, ५, ७, ८, ११, १३, १५, १६, १७, २१, २२, २६, २८, तर ‘ब’ जागांसाठी २, ३, ४, ६, ९, १०, १२, १४, १८, १९, २०, २३, २४, २५, २७, २९, ३० या ३० जागा आरक्षित झाल्या. उर्वरित सात जागा ज्या प्रभागात दोन जागा अनारक्षित आहे, त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहेत. यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब या जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. १५ प्रभागात तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. प्रभाग आरक्षित झाल्याने काही इच्छुकांची चांगलीच अडचण झाली आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…