Categories: क्रीडा

हार्दिक-नेहराच्या गेम प्लानने केले गुजरातला चॅम्पियन

Share

अहमदाबाद : आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपली पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’ला ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आले आहे. खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर आणि स्पर्धेच्या सुरूवातीला कुणीच गुजरात टायटन्सना आयपीएल जिंकण्यासाठी दावेदार धरले नव्हते.

गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या याला लिलावाआधी विकत घेऊन कर्णधार केले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते, कारण त्याच्या फिटनेसचा प्रश्न उभा होता. टी-२० वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर हार्दिक हा टीम इंडियाबाहेर गेला, तसेच तो त्यानंतर क्रिकेटही खेळत नव्हता, पण आयपीएलमध्ये हार्दिक पूर्णपणे फिट होऊन परतला.

रोहित शर्माकडून कॅप्टन्सीचे गूण शिकलेल्या हार्दिकने तीच रणनिती गुजरातच्या टीममध्ये राबवली. आर. साई किशोर, यश दयाळ यांच्यासारख्या युवा खेळाडूंवर त्याने विश्वास दाखवला. गुजरातचा ओपनर शुभमन गिल चांगल्या सुरूवातीनंतर आयपीएलच्या मधल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता, पण तरीही हार्दिक त्याच्या रणनितीवर ठाम राहिला व याचा फायदा त्यांना झाला आणि लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिला.

कोच आशिष नेहरा याचा मैदानाबाहेरचा गेम प्लान यशस्वी ठरला. जवळपास सगळेच कोच लॅपटॉप आणि तंत्रज्ञानाचा वापर करत होते, पण आशिष नेहरा याला अपवाद ठरला. लिलावामध्येही नेहरा ऑक्शन टेबलवर बसून बोली लावत होता. नेहराने ऑक्शन टेबलवर आणि आयपीएलदरम्यान मैदानाबाहेरही रणनिती साधी आणि सरळ ठेवली.

फिनिशरची उत्तम कामगिरी…

डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या फिनिशरनी गुजरात टायटन्सना अनेक रोमांचक विजय मिळवून दिले. गुजरातने या मोसमात ९ सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग केला. त्यातल्या ८ मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या आणि ७ मॅचमध्ये गुजरातचा विजय झाला.

युवा-अनुभवी खेळाडूंचे मिश्रण

गुजरात टायटन्सकडे या मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण होते. साई किशोर, अभिनव मनोहर, यश दयाळ, दर्शन नालकंडे, या नवख्या खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याशिवाय हार्दिक, राशिद, गिल, मिलर, शमी आणि तेवातिया या आयपीएलचा अनुभव असलेल्या खेळाडूंनीही एकहाती मॅच जिंकवून दिल्या.

ट्रोलिंग करणाऱ्यांना मैदानात दिले उत्तर….

आयपीएल साठी झालेल्या लिलावानंतर गुजरातच्या टीमचे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करण्यात आले, पण त्यांनी या सगळ्याचे मैदानात उत्तर दिले. लिलावामध्ये गुजरातने सुरूवातीला विकेट कीपरलाच विकत घेतले नव्हते, अखेरच्या तासामध्ये गुजरातने ऋद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेडवर बोली लावली. ऋद्धीमान साहाने या मोसमात धमाका केला. साहाने ११ सामन्यांमध्ये ३१.७० च्या सरासरीने आणि १२२.३९ च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा केल्या.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago