मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये जोरदार आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून काही दिवसाआधीच दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
यावर्षी मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण, आता मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारणपणे आठवडाभरात महाराष्ट्रात मान्सूनची आगमन होते.
दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. केरळनंतर मान्सूनची महाराष्ट्रातील पहिली एन्ट्री तळकोकणात होते आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…