दिवसभरात २३४ नवे कोरोना रुग्ण

मुंबई (वार्ताहर) : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत २३४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मागील २४ तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नसून १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या १२९४ सक्रिय रुग्ण आहेत.


मुंबईमध्ये आतापर्यंत १०,४२,०४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे ९८ टक्के आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी ४२०८ झाला आहे.


मुंबईत सध्या एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.०१६ टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात आढळून आलेल्या २३४ रुग्णांपैकी २२६ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५१० बेड्स असून त्यापैकी ४३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम