देशात २२२६ नवे कोरोना रूग्ण

नवी दिल्ली (हिं.स.) : गेल्या २४ तासात देशात २२२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज कोरोवा रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. काल देशात २ हजार ३२३ नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी २१ मे रोजी कोरोनाचे एकूण २ हजार ३२३ नवीन रुग्ण आढळून आले होते आणि २५ जणांचा मृत्यू झाला होता. आज २ हजार २२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६५ जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवरुन आता १४ हजार ९५५ वर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास २ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या रुग्णांच्या संख्येत ४१ प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. संसर्गाचा दैनंदिन दर ०.५० टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक संसर्ग दर देखील ०.५० टक्के होता. आत्तापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ही ४ कोटी २५ लाख ९७ हजार ३ झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.२२ टक्के नोंदवले गेले आहे. देशव्यापी अँटी-कोविड-१९ लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९२.२८ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१