कणकवली (प्रतिनिधी) : सूक्ष्म लघू, मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने एमएसएमई विकास संस्था मुंबईच्या वतीने २१ ते २३ मे, रोजी कणकवली येथे “सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव” कणकवलीत रेल्वे स्टेशन रोडनजीक उपजिल्हा रुग्णालयासमोर आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते २१ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. कोकण विभागातील एमएसएमईना चालना देण्यासाठी हा महोत्सव हाती घेण्यात आला आहे. यात ६० उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करणार आहे, अशी माहिती एमएसएमईचे डायरेक्टर पी. एम. पार्लेवार यांनी दिली. हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला पार्लेवार यांच्या समवेत असिस्टंट डायरेक्टर व्ही. आर. शिरसाट, राहुल मिश्रा, डी. आर. जोहरी आदी उपस्थित होते. या महोत्सवादरम्यान तीन दिवस कोकणातील उद्योजकांच्या वस्तुचे,उत्पादित मालाचे व त्यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग महोत्सवात विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जसे कोकण रेल्वे, IOCL , HPCL, BPCL डॉक इत्यादीचे प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि सहभागी यूनिट्सना त्यांच्या विक्रेता नोंदणी प्रक्रियेवर सादरीकरण देणार आहेत व त्यांना सरकारी खरेदी कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी सहकार्य करणार आहेत.
या महोत्सवात तीनदिवसीय मेगा इव्हेंटमध्ये सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या उत्पादनांचे आणि सेवाचे प्रदर्शन, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे विक्रेता विकास संमेलन, होतकरू तरुणांसाठी बँक लोन मेळावा, एमएसएमई योजनांबद्दल जागरूकता कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…