रत्नागिरी (वार्ताहर) : दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यात बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये अनेकदा पाणीच नसल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
मे महिन्यात ऐन गर्दीच्या मोसमात हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना शुक्रवारी दिव्याहून सावंतवाडीला जाणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यांमध्ये बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यापूर्वीही सतत असे प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दररोज दिव्याहून सावंतवाडीसाठी सुटणारी १०१०५ या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचे रूप अलीकडच्या काळात चांगलेच बदलण्यात आलेले आहे. मात्र, बाह्यरूप बदललेले असले तरी या एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे बाह्यरूप बदललेल्याने सुखावणारे प्रवासी नंतर गाडीत गेल्यावर तेथे पाण्याचा तुटवडा आढळल्यावर हिरमुसले होतात. या एक्स्प्रेसच्या बहुसंख्य डब्यातील टॉयलेटसह बेसीनमध्ये १३ मे रोजी पाणीच नव्हते, अशी माहिती हाती आली आहे.
त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी तर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन बेसिनमध्ये तोंड धुतले, तर काही प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या घेऊन टॉयलेट गाठले. त्यामुळे बहुतांश डब्यात बेसीनसह टॉयलेटमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. या गंभीर प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…