Sunday, April 20, 2025
Homeमहामुंबईशाळेची फी भरण्यासाठी क्राउड फंडिंगमधून जमवले एक कोटी

शाळेची फी भरण्यासाठी क्राउड फंडिंगमधून जमवले एक कोटी

मुंबईच्या मुख्याध्यापिकेची कमाल; शेकडो मुलांचे शिक्षण वाचले

मुंबई : मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पालकांनी केलेल्या अथक परिश्रमाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण आज आम्ही मुंबईतील एका शाळेतील शिक्षकाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी शाळेत शिकणाऱ्या मुलांची फी भरण्यासाठी क्राऊड फंडिंगची पद्धत आजमावली. जेव्हा कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या. देणगीदार बहुतेक एनजीओ आणि व्यक्ती होते.

मुंबईतील पवई भागातील एका शाळेतील मुख्याध्यापिका म्हणून काम करणाऱ्या शर्ली पिल्लई यांना स्वत:चा हा उपक्रम इतका यशस्वी होईल याची कल्पनाही नव्हती. शिक्षक म्हणून ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या शाळेच्या फीबाबत पालकांमध्ये चिंता असल्याचे त्यांनी पाहिले. शर्ली पिल्लई या पवई हायस्कूलच्या मुख्यध्यापिका आहेत.

पालकांची नोकरी सुटली

२७ मे २०२१ रोजी बातमी प्रकाशित झाली होती की कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्याचबरोबर अनेकांच्या पगारात मोठी कपात करण्यात आली. अशा परिस्थितीत मुलांच्या शाळेची फी भरणे कठीण झाले होते. हे सर्व पाहता शर्ली पिल्लई यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्याला कॉर्पोरेट हाऊसेस आणि इतरांकडून सुमारे ४० लाखांच्या देणग्या मिळाल्या. ज्यातून त्यांनी २०० मुलांची २०१९-२० वर्षाची फी भरली.

फेब्रुवारीत ९० लाखांची देणगी

पिल्लई म्हणाल्या की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात देणगीची रक्कम ९० लाखांवर गेली आहे. तथापि, गेल्या महिन्यात त्यांनी थोडे अतिरिक्त प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. १४४ विद्यार्थ्यांच्या पालकांना सत्र २०२१-२२ ची फी भरण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांना समजले. फीमुळे अनेक पालक प्रचंड नाराज असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पुन्हा देणगीदारांचे दार ठोठावले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपूर्वी फीचा निपटारा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पिल्लई यांच्या म्हणण्यानुसार, यावेळीही लोकांनी उघडपणे देणगी दिली आणि आम्हाला ६१ लाख रुपये मिळाले. या पैशातून ३३० मुलांची फी भरली.

शर्ली पिल्लई म्हणाल्या की ज्याप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळाला. हे आश्चर्यचकित करणारे होते. वैयक्तिकरित्या, मुलांची फी भरण्यासाठी लोकांनी उदारपणे देणगी दिली. काहींनी एक-दोन मुलांची फी भरण्यासाठी पैसेही दिले. यावेळी निधी संकलनासाठी संगीताचा कार्यक्रमही होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की जगभरातील आमच्या माजी विद्यार्थ्यांनीही खूप मदत केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -