एक जूनपासून यांत्रिकी नौकांना सागरी मासेमारी बंदी

रत्नागिरी (हिं. स.) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम आणि सुधारणा अध्यादेशान्वये यावर्षी येत्या १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील, असे सूचित करण्यात आले आहे.


ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना ती लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे आदेश लागू राहतील. सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका, नौकेवर बसविलेली उपसाधने आणि मासेमारी सामग्री तसेच त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त कठोर शिक्षा केली जाईल.


सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद आणि अन्य संबंधितांनी याची नोंद घेऊन विहित बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा