बँकॉक (वृत्तसंस्था) : थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताने इतिहास रचला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार असून भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान आहे. स्पर्धेत ७३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी भारताने डेन्मार्कला ३-२ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यात भारताची इंडोनेशियाशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचे पथक निश्चित झाले होते. भारतीय संघ पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेत पथकावर नाव कोरणार आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन मैदानात होता. त्याचा विक्टर एक्सेलसनविरुद्ध १३-२१, १३-२१ असा पराभव झाला. हा सामना ४९ मिनिटे चालला. दुसऱ्या सामना डबल्समध्ये खेळला गेला.
या सामन्यात सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने किम आस्त्रुप आणि मथियास क्रिस्टिएंसन जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २२-२० असे पराभूत केले. तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात किदांबी श्रीकांतने आंद्रेस एंटोनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे पराभूत केले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…