शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार ८ मार्च २०२६ रोजी आहे. तब्बल २९ दिवस टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी यंदा विश्वचषकाचे संयुक्तरित्या आयोजन केले आहे. यंदाच्या विश्वचषकात वीस संघ सहभागी झाले आहेत. या संघांची प्रत्येकी पाच अशा पद्धतीने ए, बी, सी, डी या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गतविजेत्या भारताचा सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.


स्पर्धेच्या पहिल्या म्हणजे शनिवार ७ फेब्रुवारी रोजी तीन साखळी सामने होणार आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात पहिला सामना होईल. कोलकात्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईत भारत आणि अमेरिका यांच्यात लढत होणार आहे.


गट विभागणी (Groups)




  1. गट A: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया.

  2. गट B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान.

  3. गट C: इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ, स्कॉटलंड, इटली.

  4. गट D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा.


पहिल्या टप्प्यात गट फेरी अर्थात साखळी सामन्यांची फेरी होणार आहे. यात प्रत्येक संघ गटातील इतर चार संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 या फेरीत जातील. नंतर चार - चार संघांचे दोन गट केले जातील. सुपर 8 या फेरीअंती दोन्ही गटातून सर्वोत्तम २-२ संघ उपांत्य फेरीला पात्र ठरतील. यानंतर दोन उपांत्य सामने होतील. यातील पहिला उपांत्य सामना कोलंबो किंवा कोलकाता येथे तर दुसरा उपांत्य सामना मुंबईत वानखेडेवर होणार आहे. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होणार आहे.


T20 विश्वचषक वेळापत्रक २०२६






























































































































































































































































तारीख सामना वेळ (IST) मैदान
७ फेब्रुवारी नेदरलँड वि. पाकिस्तान सकाळी 11:00 एसएससी, कोलंबो
७ फेब्रुवारी स्कॉटलंड वि. वेस्ट इंडीज दुपारी 3:00 ईडन गार्डन्स, कोलकाता
७ फेब्रुवारी भारत वि. अमेरिका संध्याकाळी 7:00 वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड सकाळी 11:00 चिदंबरम, चेन्नई
८ फेब्रुवारी इंग्लंड वि. नेपाळ दुपारी 3:00 वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारी श्रीलंका वि. आयर्लंड संध्याकाळी 7:00 प्रेमदासा, कोलंबो
९ फेब्रुवारी स्कॉटलंड वि. इटली सकाळी 11:00 ईडन गार्डन्स, कोलकाता
९ फेब्रुवारी ओमान वि. झिम्बाब्वे दुपारी 3:00 एसएससी, कोलंबो
९ फेब्रुवारी कॅनडा वि. दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:00 मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१० फेब्रुवारी नामिबिया वि. नेदरलँड सकाळी 11:00 अरुण जेटली, दिल्ली
१० फेब्रुवारी न्यूझीलंड वि. युएई दुपारी 3:00 चिदंबरम, चेन्नई
१० फेब्रुवारी पाकिस्तान वि. अमेरिका संध्याकाळी 7:00 एसएससी, कोलंबो
११ फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका सकाळी 11:00 मोदी स्टेडियम, अहमदाबाद
११ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड दुपारी 3:00 प्रेमदासा, कोलंबो
११ फेब्रुवारी इंग्लंड वि. वेस्ट इंडीज संध्याकाळी 7:00 वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारी श्रीलंका वि. ओमान सकाळी 11:00 पल्लेकेले, कॅन्डी
१२ फेब्रुवारी इटली वि. नेपाळ दुपारी 3:00 वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारी भारत वि. नामिबिया संध्याकाळी 7:00 अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे सकाळी 11:00 प्रेमदासा, कोलंबो
१३ फेब्रुवारी कॅनडा वि. युएई दुपारी 3:00 अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारी नेदरलँड वि. अमेरिका संध्याकाळी 7:00 चिदंबरम, चेन्नई
१४ फेब्रुवारी आयर्लंड वि. ओमान सकाळी 11:00 एसएससी, कोलंबो
१४ फेब्रुवारी स्कॉटलंड वि. इंग्लंड दुपारी 3:00 ईडन गार्डन्स, कोलकाता
१४ फेब्रुवारी न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:00 मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१५ फेब्रुवारी नेपाळ वि. वेस्ट इंडीज सकाळी 11:00 वानखेडे, मुंबई
१५ फेब्रुवारी नामिबिया वि. अमेरिका दुपारी 3:00 चिदंबरम, चेन्नई
१५ फेब्रुवारी भारत वि. पाकिस्तान संध्याकाळी 7:00 प्रेमदासा, कोलंबो
१६ फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. युएई सकाळी 11:00 अरुण जेटली, दिल्ली
१६ फेब्रुवारी इंग्लंड वि. इटली दुपारी 3:00 ईडन गार्डन्स, कोलकाता
१६ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका संध्याकाळी 7:00 पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारी कॅनडा वि. न्यूझीलंड सकाळी 11:00 चिदंबरम, चेन्नई
१७ फेब्रुवारी आयर्लंड वि. झिम्बाब्वे दुपारी 3:00 पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारी स्कॉटलंड वि. नेपाळ संध्याकाळी 7:00 वानखेडे, मुंबई
१८ फेब्रुवारी दक्षिण आफ्रिका वि. युएई सकाळी 11:00 अरुण जेटली, दिल्ली
१८ फेब्रुवारी नामिबिया वि. पाकिस्तान दुपारी 3:00 एसएससी, कोलंबो
१८ फेब्रुवारी भारत वि. नेदरलँड संध्याकाळी 7:00 मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१९ फेब्रुवारी इटली वि. वेस्ट इंडीज सकाळी 11:00 ईडन गार्डन्स, कोलकाता
१९ फेब्रुवारी श्रीलंका वि. झिम्बाब्वे दुपारी 3:00 प्रेमदासा, कोलंबो
१९ फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. कॅनडा संध्याकाळी 7:00 चिदंबरम, चेन्नई
२० फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. ओमान संध्याकाळी 7:00 पल्लेकेले, कॅन्डी


  • २१ फेब्रुवारीपासून सुपर-8 चे सामने सुरु होतील.

  • पहिला उपांत्य सामना : ४ मार्च (कोलंबो किंवा कोलकाता)

  • दुसरा उपांत्य सामना : ५ मार्च (मुंबई) – जर भारत पात्र झाला तर हा सामना वानखेडेवर होईल.

  • अंतिम सामना : ८ मार्च (अहमदाबाद किंवा कोलंबो)


 
Comments
Add Comment

T20 Series: झिम्बाब्वे दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीसमोर इतिहास रचण्याची संधी; ११ षटकारांनी होऊ शकतो विश्वविक्रम

 T20 Series : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता झिम्बाब्वेविरुद्धच्या

ALL T20 : आशियाई लेजेंड्स लीगमध्ये रायडू, पठाण, दिलशान चमकणार, झाम्बियात ३० जुलैपासून सीझन २ रंगणार

नवी दिल्ली : आशियाई लेजेंड्स लीगचा बहुप्रतीक्षित दुसरा सीझन जगभरातील क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करण्यासाठी

Commonweath Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठे बदल ! प्रमुख खेळांना वगळण्यात आले, भारतावर किती होणार परिणाम ?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. यंदाची स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक