टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्या दमाची ही 'मराउडिंग' भारतीय संघ प्रथमच जागतिक मंचावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे.


कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. आतापर्यंत सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित शर्माने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जेतेपद जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. तर भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे.


स्फोटक फलंदाज इशान किशन यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सलामीैीला येण्याची शक्यता आहे, तर त्याला युवा प्रतिभावान अभिषेक शर्मा साथ देऊ शकतो. मधल्या फळीत टिळक वर्माची शांतता आणि हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंची ताकद कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्यास सक्षम आहे. या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अमेरिकेच्या संघात असलेले 'स्थानिक' चेहरे. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर, अष्टपैलू हरमीत सिंग आणि शुभम रंजने हे तिघेही मुंबईकडून वानखेडेवर खेळलेले आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि ओळखीच्या खेळपट्टीवर खेळताना हे 'मुरब्बी मुंबईकर' अमेरिकेला विजयाची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह सांभाळणार असून त्याला अर्शदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा साथ देतील. फिरकीच्या जाळ्यात अमेरिकेला अडकवण्यासाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सज्ज आहेत. मात्र, वानखेडेवरील दवाचा परिणाम खेळावर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये गट टप्प्यातील दिवसभरात रोज ३ सामने खेळवले जाणार आहे. हे तिन्ही सामने वेगवेगळ्या वेळांना खेळवले जाणार असून पहिला सामना ११ वाजता, दुसरा सामना ३ वाजता, तर तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. विविध ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.


अमेरिकेला पलटवार करण्याची तयारी


अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानसारख्या माजी विजेत्याला नमवून आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेतील तीन आठवड्यांच्या सराव शिबिरानंतर अमेरिकेचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहे.


भारताचे ‘अ’ गटातील सामने

  1. ७ फेब्रुवारी भारत वि. अमेरिका वानखेडे स्टेडियम मुंबई

  2. १२ फेब्रुवारी भारत वि. नामिबिया अरुण जेटली स्टेडियम दिल्ली

  3. १५ फेब्रुवारी भारत वि. पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो

  4. १८ फेब्रुवारी भारत वि. नेदरलँड्स नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद

Comments
Add Comment

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात