१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि त्यातही धुवांधार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची. कारण वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. झिम्बाब्वेतील हररेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभवने फक्त ५५ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले आहे.



शानदार शतकांची खेळी


१९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना वैभवने पराक्रम केला. त्याने केवळ ५५ चेंडूत ८ चौकार आणि ८ उत्तुंग सिक्सर मारत आपलं शतक पूर्ण केल आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे. शतक झळकावल्यानंतरही वैभवची आक्रमक खेळी सुरू राहिली. त्याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. अवघ्या ३० चेंडूत वैभवने १५० धावा केल्या.



विक्रमी खेळी


शतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने अनेकी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने १६.१ ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या चेंडूत लॉन्ग ऑफच्या वरून षटकार मारत डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडीत काढला आहे. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसने २०२२ मध्ये ६ सामन्यात २० षटकार मारले होते, पण वैभवने त्यालाही मागे टाकले आहे.



विराट आणि शुभमन गिललाही टाकले मागे


वैभवने ऐतिहासिक खेळीदरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. चक्क विराट कोहली, शुभमन गिल यांचे विक्रम वैभवने मोडले आहेत. २००८ च्या वर्ल्ड कपमधील तन्मय श्रीवास्तवचा रेकॉर्ड मोडीत काढत तो यूथ वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज झाला आहे. फायनलपूर्वी वैभवला हा टप्पा गाठण्यासाठी ८० धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. या स्पर्धेत त्याने यापूर्वीच विराट कोहली, शुभमन गिल, सरफराज खान आणि उन्मुक्त चंद यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या धावांचे विक्रम मागे टाकले आहेत.


भारताने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या ३११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी हरवून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. सध्या भारतीय संघ आपला १० व फायनल सामना खेळत आहे तर इंग्लंडचा संघ सहाव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा हे विजेतेपद मिळवले आहे. तर सध्या इंग्लंड आपल्या १९९८ नंतर आपल्या दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा करत आहेत.

Comments
Add Comment

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी