शिवसेनेच्या सभेच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंच्या सभेचे फुटेज

मुंबई : राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी १४ मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईच्या बीकेसी मैदानावर सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सभेचे टिझर लाँच करून शिवसेनेकडून जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. या टिझरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. टिझरमध्ये असलेली गर्दी ही राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. आता कळले असली कोण आणि नकली कोण, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, काळे यांच्या आक्षेपानंतर शिवसेनेकडून ते फुटेज काढण्यात आले आहे.


शिवसेनेकडून, लावण्यात आलेल्या 'असली आ रहा है, नकली से बचो', अशा आशयाचे बॅनर्सवर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. असली, नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असु द्या. इतके ही नकली होऊ नका. अजून माणसे जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का, असा सवाल गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. तसेच आपली चूक लक्षात आल्यावर शिवसेनेने टिझरचे ट्विट डिलिट केल्याचेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/GajananKaleMNS/status/1524272986496266241

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेला राज्यभरातून मनसैनिक आले होते. पोलिसांनी या सभेसाठी केवळ १५ हजार श्रोत्यांची मर्यादा आखून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या सभेला मोठी गर्दी जमली होती. राज ठाकरे यांच्या सभांना जमणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, आता शिवसेनेने आपल्या सभेच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे यांच्या सभेचे फुटेज वापरल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. आता शिवसेना यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती