मुंबई : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असून राज्यात तापमानाचा पारा वाढतच आहे. विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत तापमानात वाढ होत आहे. अशातच पुढचे तीन दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस येलो अलर्ट राहणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळाची तीव्रता १० आणि ११ मे या दिवशी वाढणार आहे. या कालावधीत राज्यात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात १० ते १२ मे दरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी ब्रह्मपुरीत ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांतही तापमानाचा पारा ४४ अंशांपुढे होता. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये ४० अंश, तर परभणी आणि नांदेड येथे ४१ अंशांपुढे तापमानाची नोंद झाली.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…