Thursday, October 30, 2025
Happy Diwali

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल, पोलिसांनी बजावली कलम १४९ नोटीस

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल, पोलिसांनी बजावली कलम १४९ नोटीस

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण तापलेले असताना आता त्या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले आणि त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाणाचे आव्हान दिले आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. मात्र पोलिसांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानी जाऊन राणा दाम्पत्याला १४९ ची नोटीस दिली आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असून त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान दिल्याने मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्री बाहेर जमा झाले आहेत. राणा दाम्पत्याने शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. मात्र आपण गनिमी काव्याने मातोश्रीवर येणारच, असे रवी राणा यांनी म्हटले होते. त्यामुळे शिवसैनिक पुन्हा मातोश्री येथे जमा होण्यास सुरूवात झाली असून ते राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

राणा दाम्पत्य खार येथील त्यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आक्रमक झालेले शिवसैनिक जमा झाले आहेत. रवी राणा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच मातोश्रीबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केरण्यात आला आहे.

Comments
Add Comment