खेड (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्याची घटना घडली. यावेळी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला. या आगीत एक कामगार भाजला असून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील सर्वात मोठी रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे आहे. गेल्या दोन वर्षांत या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातून आग लागून काही कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण जायबंदी झाले आहेत. या दुर्घटनांमुळे लोटे पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर प्रिव्ही कंपनी (जुनी रत्नागिरी केमिकल) या कंपनीत प्रक्रिया सुरू असताना अचानक आग लागली. यावेळी एक कामगार भाजला गेला. रविवार पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल करत होते. या आगीत कंपनीची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, या आगीमुळे कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले असून घटनास्थळी नागरिकांसह पोलीस व प्रशासनाचे अधिकारी पोहोचले होते.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…