शरीरसौष्ठव स्पर्धेत उदय देवरे ‘रायगड श्री’चा मानकरी

  87

पेण (वार्ताहर) : स्वररंग पेण आयोजित पेण फेस्टिवलमध्ये आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत उदय देवरे
याने 'रायगड श्री' चा किताब, तर उदेश ठाकूर याने 'पेण आमदार श्री' चे पारितोषिक पटकावले. यावेळी युथ आयकॉन सेलिब्रिटी ट्रेनर समीर दाबिळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्वररंग पेणतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात अक्षय गोपाळे (बबली फिटनेस), ६५ किलो वजनी गटात दीपक राऊळ (अलिबाग), ७० किलो वजनी गटात उदय देवरे (हनुमान जीम), ७५ किलो वजनी गटात अजित म्हात्रे (रायगड हेल्थ जिम) व मेन फिजिकमध्ये योगेश पाटील (हनुमान जिम) या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला. शेवटी विजेत्यांमध्ये झालेल्या अंतिम स्पर्धेत "रायगड श्री" चा विजेता उदय देवरे, तर "पेण आमदार श्री" चा उदेश ठाकूर हा मानकरी ठरला.


विजेत्यांना पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी, मार्गदर्शक वैकुंठ पाटील, स्वररंग उपाध्यक्ष सुनील पाटील, मनसे तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, युवा नेते निळकंठ म्हात्रे, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, सचिव कौस्तुभ भिडे, अनिरुद्ध पवार, अभिराज कणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी निकेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. गेले १२ दिवस दररोज विविध कार्यक्रमांनी गाजलेल्या पेण फेस्टिवलची सांगता शरीरसौष्ठव स्पर्धेने झाली.

Comments
Add Comment

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर