दिल्लीत झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी भागात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या दाखल झाल्या. आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.


पूर्व दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, "रात्री एक वाजता गोकुळपुरी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली. सर्व बचाव उपकरणांसह पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन दलाशी देखील संपर्क साधला, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळपास चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीच्या घटनेत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असून ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत."


याचबरोबर, दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनाही आगीची माहिती दिले आहे. ते म्हणाले, "आम्ही ७ जळालेले मृतदेह बाहेर काढले, ज्यांची ओळख पटलेली नाही. असे दिसते की हे लोक झोपले होते आणि आग खूप वेगाने पसरली म्हणून ते बाहेर पडू शकले नाहीत. तसेच 60 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आम्हाला अद्याप या आगीचे कारण समजू शकले नाही"


मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केला शोक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडितांना भेटणार आहे, असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची