राज्य सरकारकडून एसटीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न

  172

रत्नागिरी (वार्ताहर) : हे सरकार अलिबाबा चाळीस चोरांचे आहे, तुमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. न्यायपालिका आपणास न्याय देईल. शांततेने, संयमाने न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवा. मंत्र्यांना संपकरी मंडळी दिसत नाहीत. मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना बरेच मोठे पोलीस संरक्षण दिले जात आहे, पण एस.टी. कर्मचारी काय तुम्हाला त्रास देत आहेत का? शिवशाहीचे कंत्राट कोणाचे हे पाहिले पाहिजे. हे राज्य सरकार एसटीचे खासगीकरण, मोक्याच्या जागा लुटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.



संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर बाळ माने बोलत होते. ते म्हणाले, एसटीचे कर्मचारी सर्वच राजकीय पक्षांकडे आशेने पाहत आहेत. पण सत्ताधारी पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींना तुमच्या वेदना समजून घेण्यास वेळ नाही. दोन महिन्यांत ७७ कर्मचारी सोडून गेले. हे सरकार कल्याणकारी नाही. एसटी तोट्यात नाही पण हे सरकार सातत्याने एसटी तोट्यात असल्याचे दाखवत आहे. अवैध वाहतूकदारांवर कारवाई केली जात होती. पण आता त्यांचीच मदत घेऊन, हप्ते घेऊन वाहतूक सुरू आहे. पण दुर्दैवाने अपघात झाला तर भरपाई देणार कोण, याला जबाबदार कोण? असा सवाल माने यांनी उपस्थित केला.



पूर्वी वीज महामंडळाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अनंत गीते ऊर्जामंत्री होते. केंद्र सरकारने अभ्यास केला आणि विभाजन केले. आज त्याचा फायदा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल विभाग, रेल्वे वाहतूक, बीएसएनएल याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. विचार करून एसटीबाबत निर्णय घेतल्यास एसटी फायद्यात येईल. मालवाहतूक एसटीला तारेल. माझे एसटीशी

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने