Friday, July 19, 2024
Homeक्रीडाट्रॅव्हिस हेड तारणहार

ट्रॅव्हिस हेड तारणहार

अॅशेस मालिका; ऑस्ट्रेलिया ३ बाद १२वरून ६ बाद २४१ धावा

होबार्ट (वृत्तसंस्था): अॅशेस क्रिकेट मालिकेतील शेवटच्या आणि अंतिम कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी ६ बाद २४१ धावा केल्या. मधल्या फळीतील ट्रॅव्हिस हेड (११३ चेंडूंत १०१ धावा) यजमानांसाठी तारणहार ठरला.
पहिल्या दिवशी पावसामुळे एका सत्राचा खेळ वाया गेला. खेळ थांबवावा लागला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर ६ बाद २४१ धावा आहेत. यजमानांनी ५९.३ षटके खेळताना अडीचशेच्या घरात झेप घेतली तरी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसह ऑली रॉबिन्सनच्या अचूक माऱ्यासमोर आघाडी फळी कोसळल्याने दहाव्या षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १२ धावा अशी झाली. मात्र, हेडमुळे ते सुस्थितीत आले. २३वा सामना खेळणाऱ्या हेडचे चौथे शतक आहे. त्याने झटपट शतक ठोकले. केवळ ११३ चेंडू खेळणाऱ्या या मधल्या फळीतील बॅटरने १२ चौकार मारले.

हेडने शानदार शतक ठोकले. शिवाय दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या करताना ऑस्ट्रेलियाला सावरले. त्याने पाचव्या विकेटसाठी कॅमेरॉन ग्रीनसह केलेली १२१ धावांची भागीदारी डावातील सर्वाधिक ठरली. त्यापूर्वी, मॅर्नस लॅबुशेनसह चौथ्या विकेटसाठी झटपट ७१ धावा जोडल्या. ट्रॅव्हिस हेडकडून बोध घेत ग्रीननेही महत्त्वपूर्ण ७४ धावा काढल्या. त्याच्या १०९ चेंडूंतील खेळीत ८ चौकारांचा समावेश आहे. लॅबुशेनच्या ५३ चेंडूंतील ४४ धावाही ऑस्ट्रेलियाच्या डावात मोलाच्या ठरल्या. त्याने ९ चौकार मारले.

त्यापूर्वी, स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सनच्या (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची आघाडी फळी कोसळली. २२ चेंडू खेळूनही डेव्हिड वॉर्नर खाते उघडू शकला नाही. दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासुद्धा (२६ चेंडूंत ६ धावा) लवकर परतला. वॉर्नर पाठोपाठ माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथही भोपळ्यावर बाद झाला. मात्र, मधल्या फळीने यजमानांचा डाव सावरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -