...अन्यथा वेंगुर्ले रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून बंद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तत्काळ रुजू करावे अन्यथा सोमवारपासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा बंद होणार असल्याचे पत्र अधिपरिचारिकांनी आरोग्य सहसंचालकांना लेखी स्वरूपात दिले आहे.



रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारीकांजवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला आहे. त्यामुळे रुग्णपत्रक काढणे, औषध वितरीत करणे ही कामे अधिपरिचारीकांना करावी लागतात, पण ती त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाहीत. अधिपरिचारीकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रुग्णसेवेसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविण्यात येऊ नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, सदर पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या अधिपरिचारिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही परिचारीका सदरचा कार्यभार सांभाळण्यास तयार नाही.



याला वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व आरोग्य सहसंचालक कोल्हापूर यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान अधिपरीचारिका यांच्या आंदोलनामुळे वेंगुर्ले रुग्णालयाची गैरसोय होणार आहे. तरी या संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात, त्यावरच रुग्णसेवा बंद होणार की नाही ते ठरणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी