आयपीएल आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेचा पर्याय?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेचा पर्याय ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करावी लागली. यावेळी आम्हाला ही स्पर्धा आखाती देशातून बाहेर काढायची आहे. केवळ एका देशावर अवलंबून राहू शकत नाही. आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयच्या माहितगारांनी सांगितले.

भारताचा टाइम झोन दक्षिण आफ्रिकेपेक्षा साडेतीन तास पुढे आहे. यूएई किंवा भारताप्रमाणेच, आयपीएलमधील रात्रीचे सामने लवकर सुरू करावे लागतात. जर प्रसारकांनी संध्याकाळी साडेसातच्या त्यांच्या पसंतीच्या वेळेला चिकटून राहिल्यास, दक्षिण आफ्रिकेत सामन्याचा पहिला चेंडू ४ वाजता टाकला जाईल. गेल्या काही वर्षांत, खेळाडूंनी अनेकदा मध्यरात्रीनंतर सामने संपत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

आयपीएल २०२२ म्हणजेच १५वा हंगाम अनेक अर्थांनी खास असणार आहे. संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. यावेळी मेगा लिलाव होणार असल्याने अनेक खेळाडू नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहेत. करोनामुळे देशातील परिस्थिती बिघडली आणि आयपीएल परदेशात हलवणे हाच एकमेव पर्याय वाटत असेल, तर भारतीय बोर्ड दक्षिण आफ्रिकेला पहिली पसंती देईल, या देशात २००९ मधील आयपीएल स्पर्धा खेळली गेली होती.

सध्या भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या अनेक स्पर्धा बीसीसीआयने एकापाठोपाठ एक पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत साशंकता आहे.
Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत