Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार जोकोविच

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार जोकोविच

नऊ वेळच्या विजेत्याला अखेर मुख्य ड्रॉ मध्ये स्थान

मेलबर्न (वृत्तसंस्था): ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवड्याहून कमी अवधी शिल्लक असतानाही सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या समावेशाबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता नववर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे. त्यात जगातील नंबर वन आणि नऊ वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविचलाही त्यात स्थान मिळाले आहे.

मुख्य ड्रॉ जाहीर झाल्याने प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोविचचा सहभागही निश्चित झाला आहे. तो सलामीच्या सामन्यात मिओमिर केकमानोविचशी भिडणार आहे. जोकोविचचा व्हिसा रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन-२०२२ स्पर्धेमधील त्याच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, त्याने तेथील कोर्टात ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध लढा दिला आणि केस जिंकण्यात यश मिळवले. मेलबर्न कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारला जोकोविचच्या पासपोर्टसह सर्व वस्तू तातडीने परत करण्याचे आदेश दिले. व्हिसा रद्द झाल्यानंतर जोकोविच चार दिवस इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये थांबला होता. रोनाची लस न घेतल्याचा आरोप त्याच्यावर होता, तर ऑस्ट्रेलियात कोरोना प्रतिबंधक कायदे कडक आहेत.

विशेष म्हणजे, गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरही विलगीकरण करण्याऐवजी एका वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडणे महागात पडले, असा खुलासा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू जोकोविचने बुधवारी केला होता.
‘‘कठीण कालखंडात तुम्ही सर्वानी पाठिंबा दिल्यामुळे मी आभारी आहे. परंतु डिसेंबरमधील माझ्या कृत्यांविषयी चुकीचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. १४ डिसेंबरला एका बास्केटबॉल सामन्यासाठी मी हजेरी लावली. तेथून आल्यावर १६ तारखेला मी जलद अँटिजन चाचणी केली. त्याचा निकाल नकारात्मक आला,’’ असे जोकोव्हिचने निवेदनात नमूद केले. ‘‘त्याच दिवशी मी आरटी-पीसीआर चाचणीही केली. १७ तारखेला रात्री त्या चाचणीचा सकारात्मक निकाल आला. परंतु एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त १८ डिसेंबरला घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते, तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवला नसता,’’ असेही जोकोव्हिचने सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -