पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटी हा घातपाताचाच प्रयत्न

मुंबई  :‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा पंजाबमध्ये एका फ्लायओव्हरवर वीस मिनिटे अडकणे हा घातपाताचा पूर्वनियोजित प्रयत्न होता, हे एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या या गंभीर प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टी जनजागरण करेल’, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत घडलेली घटना किरकोळ असल्याचे सांगून काँग्रेसचे नेते खिल्ली उडवत आहेत. तथापि, स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधानांच्या मार्गावर आंदोलन होणार याची खबर स्थानिक पोलिसांनी दोन - तीन दिवस आधी उच्च पदस्थांना देऊनही कारवाई करू नका, असा सूचना देण्यात आल्या. ही घटना घडली तेथून पाकिस्तानची सीमा दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ड्रोन हल्ल्याच्या टप्प्यात आहे.

हा घातपाताचा आणि पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न होता, हे आता तरी काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या पंजाब सरकारने मान्य केले पाहिजे. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाची काँग्रेस नेते खिल्ली उडवतात. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या गंभीर विषयाची खिल्ली उडवणे चिंताजनक आहे, असे ते म्हणाले. या विषयात पंजाबच्या काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना ब्रिफिंग केले. प्रियंका गांधी या कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती देणे म्हणजे हा प्रकार काँग्रेस सरकार आणि पक्षाच्या समन्वयाने झाला का, अशीही शंका उत्पन्न होते, असे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.