राजस्थानात कैद्याची हत्या करणारा अटकेत

नालासोपारा  :राजस्थानच्या जोधपूर येथे न्यायालयात हजर करण्यासाठी नेलेल्या कैद्यावर गोळीबार करून, खून करणाऱ्या मुख्य सूत्रधारास बोरिवली येथे ताब्यात घेण्यात आले. वसईच्या वालीव आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्तरित्या रविवार रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली.

शिवरतन ऊर्फ प्रिन्स भावरसिंग राजपूत असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुंडाचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. जोधपूर सिटी पूर्व राजस्थान रातानाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३५३, ३३२, ३०७, ३४, १२० (ब), सह आर्म ऍक्ट ३, २५, २७ अन्वये गु्न्हा दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कालपरी ऊर्फ प्रदीपपुरी शंकरपुरी गोस्वामी यास १८ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या पाली येथील न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर आरोपीला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना जोधपूरच्या भाटी चौराह येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. आरोपी आणि पोलिसांवर सहा गोळ्या झाडून ते फरार झाले होते. या फायरिंगमध्ये गोस्वामी या आरोपीचा जागीच मृत्यू झाला होता.

दोन टोळींच्या वादातून हा प्रकार घडल्याने राजस्थान पोलिसांनी तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. हे दोन्ही आरोपी राजस्थानवरून मुंबई, वसई-विरार परिसरात असल्याची खात्री पटल्यानंतर राजस्थान पोलीस रविवारी वसईत दाखल झाले होते. राजस्थान पोलिसांनी वसईच्या वालीव पोलिसांची मदत घेत आरोपी शिवरतन ला रविवारी रात्री बोरिवलीच्या एमसीएफ गार्डन येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Comments
Add Comment

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

मुंबई : सेव्हन हिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदीसाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके

महिला शिक्षिकांची मासिक पाळीदरम्यान रजेची मागणी

मुंबई : कर्नाटक सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर,

१ हजार २९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण; ३५ अर्ज दाखल

आतापर्यंत १० हजार ३४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी २३ निवडणूक

१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस शुल्काचा भुर्दंड

जुन्या आणि व्यावसाियक वाहनांचे फटनेस चाचणी शुल्क महागले मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात