मुंबई, : माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने शेलार यांनी दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. याबाबत आज, शनिवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून आमदार शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देणार आहेत.
याआधी एकदा गेल्या वर्षी अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. तेव्हा धमकी देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…