मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार मुंबईसह २० महापालिकांमध्ये भाजपचा तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयामुळे १९९७ नंतर पहिल्यांदाच उद्धव यांचा पक्ष मुंबई महापालिकेत विरोधी बाकांवर बसणार आहे. याआधी १९९७ ते २०२२ पर्यंत मुंबत उद्धव यांच्याच पक्षाची सत्ता होती. या ऐतिहासिक विजयानंतर २४ तासांच्या आत मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक जनहिताचे निर्णय झाले.



मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय :



  1. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध. (नियोजन विभाग)

  2. अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. वाहनधारकांना दिलासा (नगर विकास विभाग)

  3. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी -२) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग)

  4. तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ (नगर विकास विभाग)

  5. पीएम – ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई- बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबीट मॅन्डेंट (डीडीएम) द्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम मिळणार ( नगर विकास विभाग)

  6. भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी ) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर ९६.८० आर जमीन उपलब्ध करून देणार. व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे- भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी (महसूल विभाग)

  7. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी ४ हजार ७७५ कोटींची मान्यता. प्रकल्पामुळे पाच तालुकयातील ५२ हजार ४२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी (जलसंपदा विभाग)

  8. मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी. मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार. ( गृह विभाग)

  9. राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलीटी अँण्ड अँडव्हान्समेंटस् – महिमा) स्थापन करण्यास मंजुरी. प्रशिक्षित, कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय व अमंलबजावणीसाठी संस्था काम करणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

  10. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता. महामंडळाला मुख्यालयाची व बहुउद्देशीय इमारत उभी करता येणार. ( नगर विकास विभाग)

Comments
Add Comment

Bandra Fire : वांद्रे येथील 'अटलांटिक' इमारतीला भीषण आग; ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू

भीषण घटनेत दोन अग्निशमन जवान जखमी मुंबई : वांद्रे (पश्चिम) (Bandra West) येथील शेर्ली राजन रोडवरील 'अटलांटिक' (Atlantic Building) या

Water cut in Mumbai : जूनपर्यंत पाऊस न पडल्यास मुंबईकरांवर आणखी १० टक्के पाणीकपात

५ जुलैनंतर आढावा घेतल्यानंतर कपातीचा घेतला जाणार निर्णय मुंबई (सचिन धानजी) मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या

Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय

Operation Tiger in BMC : मुंबई महापालिकेतही लवकरच ऑपरेशन टायगर

- तब्बल २१ नगरसेवक टप्प्यात? मुंबई (विशेष प्रतिनिधी) उबाठाचे सहा खासदार फुटल्यानंतर याचे पडसाद आता मुंबईतील

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या