मुंबई : मार्गशीष महिन्यातला उद्याचा शेवटचा गुरुवार आहे मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून त्यांना हळदी-कुंकु लावतात.. प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला देतात.
तसंच सवाष्णीला फुल किंवा फुलांच्या वेण्या देतात. खास करून अष्टराची फुल देतात, त्यामुळे या दिवसात गोंडापासून अष्टराच्या फुलांची मागणी दुप्पटीने वाढते याच फुलांची खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते आहे. ही गर्दी पाहून नागरीकांना कोरोनाचा विसर पडला की काय? असा प्रश्न पडतोय. नागरिकांना ना नियमांची पर्वा आहे ना प्रशासनाचा धाक.. दादरच्या फुल मार्केटमध्ये सकाळी साडेपाच पासून झालेल्या गर्दीत नागरिकांचा बेफिकरपणा दिसून आला आहे.. यांना कोण आवरणार असाच प्रश्न आता पडलाय.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…