Monday, October 7, 2024
Homeमहत्वाची बातमीएसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला सुरुवात झाल्यानंतर नाशिकमधील डेपोबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी फलक फडकावून राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ६३ दिवस उलटून गेले असून अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न झाले. निलंबन, सेवासमाप्ती, बदल्यांतून दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र, आंदोलक कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडत नसल्याची सध्याची स्थिती आहे. तर आजपासून थेट एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आगारात फलकबाजीतून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

यामध्ये सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. या वक्तव्याचा निषेध म्हणून देखील फलकबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून अद्यापही अनेक कर्मचारी संपात सहभागी असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या मोठ्या वक्तव्यानंतरही राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -