चांदवड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून भाजपच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आमदार राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन केले. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, त्याचप्रमाणे थकीत वीज बिलासाठी खंडित केलेला ग्रामीण भागातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महमार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांबाबत भाजप आक्रमक झाले असून याबाबत आवाज उठवण्यासाठी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून सध्या रब्बी पिकांची पेरणी करून गहू, मका, हरभरा, भुईमूग इत्यादी पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा, तर कधी रात्री वीज पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी थकीत वीजबिलामुळे वीज पुरवठाच खंडित केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भाजपने सोमवारी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कालांतराने सुरळीत झाली. यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे आश्वासन दिले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…