नाशिक : नववर्षाचे स्वागत तथा 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. त्यात चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अवैध मद्याचा तब्बल 7 लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून नेण्यात येत होता. या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून बेकायदेशीररित्या टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनात टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.
दरम्यान दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता याचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…