Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण सीबीआयला सोपवा : देवेंद्र फडणवीस

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण सीबीआयला सोपवा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणा-या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच ३ महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत.


या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा", अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Comments
Add Comment