फोन टॅपिंग : रश्मी शुक्ला यांच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई : फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा तसेच सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशा मागण्यांची आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.


न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्ला यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यावेळी खंडपीठाने म्हटले आहे की, याचिकाकर्तीच्या मागण्या मान्य कराव्यात असे हे प्रकरण नाही. तसेच, फोन टॅपिंग प्रकरण सकृतदर्शनी दखलपात्र दिसत असल्याने त्याचा तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याला मज्जाव करणे वा गुन्हा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


दरम्यान याचिकाकर्ती रश्मी शुक्ला यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे शुक्ला यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करायची असल्यास त्यांना सात दिवसांची नोटीस देण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या