आता तरी बाधित मच्छीमारांना न्याय मिळणार का?

मुंबई (प्रतिनिधी) : कोस्टल रोड प्रकल्पात बाधित होणाऱ्या वरळीतील मच्छिमारांच्या भरपाईसाठी मसुदा धोरण व आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची नियुक्ती केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत आला असता बहुमताने तो मंजूर करण्यात आला. तर आता इतक्या वर्षांनंतर तरी मच्छीमारांना न्याय मिळेल का? सवाल भाजपने केला आहे.



कोस्टल रोड प्रकल्पामुळे मच्छीमारांचे नुकसान होत असून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सल्लागार म्हणून टाटा इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यासाठी निविदा काढल्या होत्या; मात्र निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर टाटा इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी पालिकेचा अंदाजित खर्च १ कोटी ५० लाख रुपये असून टाटा इन्स्टिट्यूटने कमी म्हणजेच १ कोटी ४४ लाखांत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.



दरम्यान या बाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी भाजपने या प्रस्तावाबाबत अनेक प्रश्न उभे केले आहेत. आजतागायत मच्छीमारांना संभाव्य नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झाले असून प्रकल्पालाही विलंब होत असल्याची टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत सत्ताधारी गंभीर नसून त्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या ५ वर्षांत प्रकल्पाचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही शिंदे म्हणाले.



तसेच समितीत सादर केलेल्या प्रस्तावात बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे सर्वेक्षण व अभ्यास करून नुकसान भरपाईसाठी मसुदा धोरण व आराखडा तयार करण्याची जबाबदारी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेवर सोपवली जाणार आहे. मात्र, त्यालाही तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर तरी मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल भाजप स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

एसटीला वर्षाला मिळणार दीड हजार कोटींचे उत्पन्न, काय आहे योजना?

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई: एसटी महामंडळ कामगारांच्या

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती : मंत्री ॲड.आशिष शेलार

नांदोश गढीचे उत्खनन, रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याचा निर्णय मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा

मेट्रो ३ मार्गिकेचा लोकार्पण सोहळा: मुंबईकरांना मिळणार जलद आणि सोयीस्कर प्रवास

मुंबई :  मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्वाचा बदल घडणार आहे. आता, आरे रोड ते कफ परेड दरम्यान

अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी