कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचा घोटाळयात वरचा नंबर!

प्रशांत जोशी

डोंबिवली : कोरोना काळात सर्वात जास्त आर्थिक घोटाळा करण्यात मुंबई महानगरपालिकेचा वरचा नंबर आहे. या काळात भारतात सर्वात जास्त कोरोना मृत्यूची संख्या आहे. मात्र, हे ठाकरे सरकारने जनतेपासून लपवले आहे. याला हे सरकार जबाबदार असून या घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. यावर मंगळवारी मुंबई महानगरपालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे, असा स्पष्ट इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीत दिला.

सोमय्या रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला.

कोरोना काळात मोदी सरकार महाराष्ट्राला मोफत लस देणार होते, मात्र मुंबई महापालिकेच्या महापौरांनी आम्हाला तुमची लस नको, आम्ही तीन महिन्यांत मुंबईतील सर्व जनतेला लस देऊ असे बोलल्या होत्या. अजूनही मुंबईतील ती लस जनतेपर्यंत पोहोचलीच नाही.
यावेळी किरीट सोमय्या यांचे ‘महावसुली सरकारचे हे घोटाळे’ हे पुस्तक कार्यकर्त्यांना देण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक मंदार हळबे यांसह महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, पूनम पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल