गोपीचंद पडळकर यांचा अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप









मुंबई : राज्यातील एसटी संप हा मुंबईतील गिरणी संपाप्रमाणे अयशस्वी करण्यासाठी तो चिघळवला जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागांवरील जमिनी मिलच्या जागांप्रमाणे विकण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेने आखल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.


मुंबईतील मिल कामगारांचा संपही अशाच पद्धतीने चिघळवण्यात आला होता. अखेर हा संप अनिर्णीत परिस्थितीत येऊन पोहोचला. त्यानंतर शिवसेनने मिलच्या मालकांसोबत साटलोटं करत जमिनी विकून कोट्यवधींची टक्केवारी गोळा केली होती. आता एसटीचा संपही त्याच मार्गाने जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मालकीच्या विविध शहरातील जमिनींची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सत्ताधारी सरकारने आखल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.


 





Comments
Add Comment

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

पुण्यात मेट्रोच्या आणखी दोन उपमार्गिकांना शासनाची मान्यता

मुंबई : पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, कोणाला मिळणार फायदा?

मुंबई : राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष; शासन शेतकऱ्यांसोबत मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील